Friday, August 24, 2007

आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड

प्रिय बंधु आणि भगिनींनो,
आज आपण माझा "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा अध्यक्ष या नात्याने जो सत्कार करत आहात, त्याबद्दल मी मनापासून आनंद आणि आभार व्यक्त करतो. खरं तर आपण माझा हा जो गौरव करत आहात, त्यातून माझ्याबद्दल आपल्या मनात असलेला जिव्हाळा अन्‌ आपुलकीच नजरेस पडते. जागतिकीकरणाच्या रेट्यात सर्वत्र चंगळवाद आणि पैशाचीच महती असताना, केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर उद्योग करण्याची आणि यशस्वीही होण्याची उमेद मला आपल्यासारख्या सर्वसामान्यांमुळेच मिळाली आहे, हे मी अभिमानाने नमूद करू इच्छितो.

खरं तर एकेकाळी मीही आपल्यासारखाच साधा एक कर्मचारी होतो. महिन्याच्या महिन्याला संसाराचा गाडा रेटताना मेटाकुटीला येण्याचे प्रसंग नेहमीच यायचे. दर महिन्याला पगाराकडे डोळे लावून बसायचे आणि पगार झाला, की निरनिराळी बिले चुकवायची हा माझा शिरस्ता होता. एखाद्या पापभीरू माणसाने खोटा आळ आल्यावर अटकपूर्व जामीन मिळवावा, तसे मी पगारपूर्व बिलांची व्यवस्था करायचो. त्यावेळी दहा तारखेला माझा पगार व्यायचा आणि अकरा तारखेला माझा "मंथ एंड' सुरू व्हायचा. जगात खर्चाचे मार्ग चोहोदिशांनी खुले होत होते आणि बचतीचे मार्ग खुंटत होते. त्यावेळी या अर्थप्रधान जीवनाला काही पर्याय आहे की नाही, हा प्रश्‍न मला पडला. त्या प्रश्‍नाला मिळालेले उत्तर आज या कंपनीच्या यशाने रूपाने आपल्यासमोर आहे.

या प्रवासाची सुरवात कशी झाली, ते येथे सांगितल्यास अप्रस्तुत ठरणार नाही. असाच एका महिन्यात पगाराची रक्कम बिलांमध्ये खर्ची पडल्यावर मी वाण्याच्या दुकानात गेलो होतो. चहासाठी घरात पावडर होते आणि साखर मात्र संपलेली होती. (जीवनातील गोडवा आधीच संपला होता, आता साखरही संपलेली होती.) दुकानदार उधारीने काही देण्याची शक्‍यता नव्हतीच. मात्र मी गरीब असल्याने माझ्याकडे प्रेम आणि करुणा खूप असल्याचे मी ओळखून होतो. त्यामुळे अत्यंत कळवळून दुकानदाराला म्हणालो, ""मालक, जरा एक किलो साखर हवी होती. माझ्याकडे आता पैसे बिल्कुल नाहीत. पण आपुलकी आणि जिव्हाळा भरपूर आहेत. तर जरा थोडासा जिव्हाळा घेऊन साखर देता का?''

मित्रहो, सांगायला खूप आनंद वाटतो. तो दुकानदार साधा किराणा दुकानदार होता. देशात अद्याप मॉलचे वारे पोचले नव्हते. त्यामुळे सौजन्य शिल्लक असलेल्या त्या दुकानदाराने मान डोलाविली आणि म्हणाला,

"साहेब, आपुलकी देत असाल तर पैशांची काय गरज आहे? अन्‌ जिव्हाळा असल्यानंतर एक काय दोन किलो साखर घ्या ना.''

हीच ती सुरवात होती. केवळ जिव्हाळा आणि आपुलकीच्या जोरावर व्यवहार करता येतो, हे मी ओळखले. त्यानंतर सिटी बस, रेल्वे, मल्टिप्लेक्‍स, हॉटेल अशा सर्व ठिकाणी मी जिव्हाळा व आपुलकीचाच वापर करून व्यवहार केला. त्यातूनच "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा जन्म झाला. कंपनीने कणाकणाने जिव्हाळा व आपुलकी जोडली व आज ती पैशांऐवजी केवळ जिव्हाळा, स्नेह आणि आपुलकीद्वारे ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवनाला नवा आनंद देत आहे, याचा सर्वांनाच आनंद व्हायला हवा.

जरा आमच्या कंपनीच्या धोरणाबद्दल सांगतो. पैसा हा जगातील सर्वच संघर्षाचे मूळ असल्याचे मार्क्‍सने म्हटले आहे. (आपल्या पूर्वसुरींनी व ज्येष्ठांनी सांगितलेल्या चांगल्या गोष्टींचे अनुकरण करायलाच हवे, नाही का?) त्यानुसार आमच्या कर्मचाऱ्यांना आम्ही कधीही पैशांमध्ये पगार देत नाही. पैशांमध्ये पगार दिला, की त्यांच्या अपेक्षा खूप वाढतात अन्‌ मानवाच्या जीवनातील सर्व दुःखांचे मूळ अपेक्षांमध्ये आहे, असे भगवान गौतम बुद्धांनी म्हटले आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, कर्मचाऱ्यांना पैशांऐवजी प्रेम आणि जिव्हाळा द्या. आमच्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना सकाळी कामावर आल्यापासून घरी जाईपर्यंत आपुलकीचा वर्षाव होतो. त्यामुळे त्यांची चित्तवृत्ती तर उल्हसित राहतेच, शिवाय कार्यक्षमताही अनेक पटींनी वाढते. एवढेच नाही, तर बाहेरच्या जगातही सर्वत्र केवळ जिव्हाळा आणि आपुलकीचाच व्यवहार करण्याचीही त्यांना सवय लागली आहे. यादृष्टीने पाहिली असता, संपूर्ण जगात आता या गोष्टींचाच प्रसार होत आहे.

जे आमच्या कर्मचाऱ्यांशी, तेच आमच्या ग्राहकांशी. आज "आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड' इतक्‍या विविध उद्योगांमध्ये आघाडीवर आहे. परंतु कुठेही आम्ही पैशांची तडजोड न करता स्नेह, जिव्हा आणि आपुलकी यांच्याच बळावर प्रगती करत आहोत. भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये चालणारे अर्थपूर्ण व्यवहार जगप्रसिद्ध आहेत. मात्र तिथेही मी, माझे कर्मचारी आणि ग्राहक केवळ याच बाबींचा उपयोग करतात. बंधु-भगिनींनो, माझं आज आपल्या सर्वांपुढे एकच सांगणे आहे. पैशांचा मोह टाळा. जागतिकीकरण आणि चंगळवाद आपल्या देशासाठी चांगला नाही. केवळ स्नेह, प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी याच शाश्‍वत बाबी आहेत. त्यांच्या उपयोगातून आपण नवीन, समाधानी आणि सुखी जग निर्माण करू शकतो. आपण केलेल्या या गौरवाबद्दल मी पुन्हा एकदा आभार मानतो अन्‌ माझे भाषण संपवितो.

8 comments:

 1. जिव्हाळा असल्यावर दोन किलो साखर मिळते, यावर एकवेळ विश्‍वास ठेवता येईल. मात्र अरे डीडी, तू तर सुटा-बुटात दिसतोयस की! टाय, ब्लेझर, अशा गोष्टी सुद्धा जिव्हाळ्यावर मिळतात? असो...हे वाचल्यानंतर मला बारा बलुतेदारी आणि रामराज्य आठवले. रामराज्य हल्ली सुद्धा आहेच, फक्त रामाचा राजकारणासाठी उपयोग केला जातो. तो निवडणूकीचाही मुद्दा बनतो. बलुतेदारी सुद्धा आहेच..फक्त "बाराची' आहे! आपली ही "पोस्ट' विचार करायला लावणारी आहे, हे नक्की. किप इट अप, डीडी

  ReplyDelete
 2. "आपुलकी आणि जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड' ही पोस्ट चांगली जमली आहे. मला मात्र तुमच्या या कॉर्पोरेशनमध्ये काम करण्याची इच्छा नाही. मी तरी सध्या पैशांचाच पुजारी आहे. पैशांच्या बरोबरीने प्रेम आणि जिव्हाळा मिळणार असेल तर चालेल, पण एकूणच तुझी पोस्ट खूपच समर्पक आहे. keep writing...

  ReplyDelete
 3. You Know DD there is one wonderful mail i got few days back. In that one lion was shown in a mannar that king of Jungle should be.

  This is not moral of story. Caption given under it was most important. "I Work for Money if
  you want Loyalty then go for Dogs".

  Same is with me DD. I work for money. Loyalty, Love and other things are not important regarding expectations from company.

  But Your article is fantastic and it should be read by your Seniors.

  Gajanan, Nanded.

  ReplyDelete
 4. You Know DD there is one wonderful mail i got few days back. In that one lion was shown in a mannar that king of Jungle should be.

  This is not moral of story. Caption given under it was most important. "I Work for Money if
  you want Loyalty then go for Dogs".

  Same is with me DD. I work for money. Loyalty, Love and other things are not important regarding expectations from company.

  But Your article is fantastic and it should be read by your Seniors.

  Gajanan, Nanded.

  ReplyDelete
 5. छान छान ! वत्सा, भौतिक जग खरच क्षणभंगुर असतं, याला तुझ्या पोस्टमुळे पुष्टी मिळते. हीच पुष्टी वत्तपत्रवाल्यांना जगण्याचे बळही देते. म्हणूनचे आम्ही सर्व एकमेकांशी आपुलकीने जिव्हाळ्याने वागत असतो. असो, हे असेच चालायचे.................
  Yogiraj

  ReplyDelete
 6. अरे वा.. तु तर आपुलकी अँड जिव्हाळा कॉर्पोरेशन लिमिटेड'चा अध्यक्ष वा...बुधवार पेठ, फरग्यूसन रस्त्यावरून दारोदार फिरलास तिथे तुला आपुलकी आणि जिव्हाळा मिळाला असता तर तुझ्या...डीवर लात कशाला मारली असती.

  ReplyDelete
 7. श्री. अनामिकराव,
  असे काहून करून राहिले बाप्पा, अजून तुला पुरे माहिती पडून राहिले नाय का बाप्पा... श्री. देविदास बाप्पाला लाथ मारली नाही तर त्यांनीच तेथून लाथ मारून बाहेर पडेलन बाप्पा.. अशा अपुर्‍या माहितीमुळेच बाप्पा अशी दिवस आलेनं तुमच्यावर... त्यामुळंच बाप्पा आपला माल खपणं कमी होऊन राहिलं पुण्यात सुद्धा.. आमच्या इदर्भात तर बाप्पा आपला मालचं चांगला येत नाही नं.. बाप्पा.. म्हणून म्हणतो की आता बास करून राहान् गुपचुप आपल्या कामात... काम करून मालकांचीच चाटत राहा नं बाप्पा गप्पगुमान... यो माझ्या तुला छोटासा सल्ला देऊन राहिलो..

  तुमचाच,
  खवचटसिंग

  ReplyDelete
 8. मा. अनामिक,
  खवचटसिंग यांनी तोडीस तोड प्रतिक्रिया देऊन योग्य ते उत्तर दिले आहेच. तरीही अपुऱ्या माहितीमुळे तुम्ही जो गैरसमज करून घेतला आहे त्याचे निराकरण व्हावे म्हणून हा शब्दप्रपंच. बुधवार पेठेत असताना मला ....डीवर लाथ मारून हाकलून दिले नव्हते तर 'धंदे का टाईम' मध्ये रेट वाढविण्याची बोलणी चालली असताना मी बुधवार पेठ सोडली होती. एफ. सी. रोडवर मी दारोदार हिंडलो नव्हतो तर उलट आजही तिथले दार उघडे असल्याचे सांगावे येत आहेत. (बाय द वे, आपणही एकदा चक्कर मारून पहा फर्ग्युसन रोडवर आपल्याला कोणी उभे करतेय का ते). शिवाय एफ सी रोडवर आपुलकी पेक्षा रोकडा जास्त मिळतो. तो वाढीव रोकडाही मी नाकारला आहे.
  त्यमुळे आजपर्यंत मी उजळ 'पार्श्वाभागा'ने फिरत आहे. तुमच्या बाबतीत तशी शक्यता असती तर अशा बेनामी टिपण्या करण्याची वेळ आली नसती.

  ReplyDelete