माझ्याबद्दल

देविदास देशपांडे हे पत्रकार असून महाराष्ट्र सरकारचा 2016 चा राज्यस्तरीय ‘सोशल मीडिया पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे. मराठीत आरंभीच्या काळापासून ब्लॉगलेखन करणार्‍या मोजक्या पत्रकारांपैकी ते एक आहेत. मूळ शहर नांदेड. सध्या पुण्यात वास्तव्य. 2001 पासून आधी उपसंपादक आणि नंतर वरिष्ठ बातमीदार म्हणून कार्यरत. आज का आनंद, केसरी, सकाळ, टाईम्स ऑफ इंडिया व पुणे मिरर इ. वृत्तपत्रांमध्ये विविध पदांवर सेवा. महाराष्ट्र हेराल्ड, Yahoo, Le MagIt (फ्रेंच), Rediff.com, बीबीसी हिंदी आणि लोकसत्ता.कॉम इ. संकेतस्थळासाठी लेखन. मराठी, हिंदी व इंग्रजीत नियमित ब्लॉगलेखन.

‘फेसबुकचा जनक मार्क झुकेरबर्ग’ आणि ‘जागतिकीकरणाची बदलती भाषा’ ही त्यांची मराठी पुस्तके प्रकाशित झाली असून ‘शनिवारवाडा’ हे अनुवादीत इंग्रजी पुस्तकही प्रकाशित झाले आहे. सध्या ते ऑर्गनायझर साप्ताहिकासाठी पुण्यातून लेखन करतात तसेच केरळमधील ‘सम्प्रति वार्ताः’ या संस्कृत वृत्त पोर्टलसाठी लेखन करतात.

इंडिया अब्रॉड, स्वदेश व पांचजन्य (हिंदी) या वृत्तपत्रांबरोबरच अनेक दिवाळी अंकांमध्ये त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. त्याच बरोबर याहू, जम्मूकाश्मीरनाऊ.कॉम (इंग्रजी), प्रवक्ता.कॉम (हिंदी), मॅगआयटी (फे्रंच), रिडीफ.कॉम, लोकसत्ता. कॉम (मराठी), आणि दिनमलर.कॉम (तमिळ) इत्यादी संकेतस्थळासाठी लेखन करतात. 

1995 पासून व्यंगचित्रे प्रकाशित. लोकपत्र, प्रजावाणी (नांदेड) यांसह सकाळ, केसरी, सकाळ अर्थमंथन व दहावी दिवाळी (केसरी) यांमध्ये मराठी व्यंगचित्रे प्रकाशित. संस्कृतमधील मोजक्या व्यंगचित्रकारांपैकी एक. ‘संभाषण संदेश’ या संस्कृत मासिकात अनेक व्यंगचित्रे प्रकाशित.

’माझी भाषा - भविष्याची भाषा’ हे त्यांचे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे.

No comments:

Post a Comment